सिद्धू मुसेवालाच्या आई चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी दिला गोंडस मुलाला जन्म


चंदिगड : सिद्धू मुसेवालाच्या आई चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी नवजात मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

मुसेवालाची हत्या होऊन दोन वर्षे झाली आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान मुलाचा फोटो शेअर करताना लिहिले आहे. ‘शुभदीपवर प्रेम करणा-या लाखो जीवांच्या आशीर्वादाने देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्या पदरात दिले आहे.

देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि आई दोघेही निरोगी आहेत. सर्व हितचिंतकांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे, असे देखील सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!