लोकशाहीतील मोठ्या उत्सवाला प्रारंभ; भाजप-एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार: PM मोदी


Modi : लोकशाहीतील मोठ्या उत्सवाला प्रारंभ झाला असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्‍हटले आहे. लोकशाहीचा सर्वात मोठ्या उत्‍सव सुरु झाला आहे. निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

आम्ही भाजप-एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्ही जनतेपर्यंत जात आहोत. येणारी ५ वर्षे हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल.

ज्यामध्ये आपण भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या विकास प्रवासाचा रोडमॅप तयार करू. हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाचा साक्षीदार असेल, असेही पंतप्रधान मोदींनी म्‍हटले आहे.

जेव्हा देशवासी म्हणतात, “मी मोदींचे कुटुंब आहे”, तेव्हा ते मला विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते. विकसित भारतासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू आणि हे लक्ष्य साध्य करू. हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे!, असेही आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!