राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? अजित पवारांचे मोठे भाष्य..


सातारा : संस्कृतपणा कसा टिकवायचा? कसं काम करायच? हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी अनेक पद भूषवली. तोच आदर्श आम्ही नवीन पिढीने ठेवला पाहिजे. सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. कोणी खेकडा म्हणत, कोणी वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत असं अजित पवार म्हणाले आहे.

आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची १११ वी जयंती आहे. अजित पवार यांनी सातारा प्रिती संगम येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वाट्याला किती जागा येणार? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, जागा वाटपाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्षांनी प्राथमिक चर्चा केली. प्रत्येक पक्षाचा मान-सन्मान राखला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पुढे ते म्हणाले की, “राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल, गढूळपणा येईल अशी वक्तव्य टाळावी, ही माझी भावना आहे. आमचा समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीची बैठक आज किंवा उद्या होऊ शकते,” असेही अजित पवार म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!