Maharashtra Politics : मोठी बातमी! धनंजय मुंडे, सुनील तटकरेंसह १२ नेते करणार भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ…


Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. अशातच आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.

अनेक दिग्ग्ज नेते, पदाधिकारी पक्षांतर करत आहेत. अशातच आता अजित पवार गटातील नेते, मंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. असा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंंढे यांनी केला आहे.

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. “धोके पे धोका, ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडेयांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार”, असा दावा अतुल लोंढे यांनी एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार, असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!