हवेलीतील यशवंत कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदारांचा निरुउत्साहाच! दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ ४३ टक्के मतदानाची नोंद..!!


उरुळीकांचन : तब्बल दिड दशकानंतर लागलेत्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूकीसाठी शनिवार (दि.९) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ४२ मतदान केंद्रांवर ४३ % इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. कारखान्याच्या २१, ४१९ मतदारांपैकी ९ ,२७० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी ९वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी१२ वाजेपर्यंत मतदारांनी प्रतिसाद दाखवत आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

यशवंत कारखान्याच्या निवडणूकीसाठी लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि केसनंद या तीन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु आहे. उरुळीकांचन येथील मतदान केंद्रावर ऊस उत्पादक गट क्रमांक १ उरुळीकांचन तर ऊस उत्पादक गट क्र. २ सोरतापवाडी या गटांचे मतदान आहे. तर लोणी काळभोर येथे ऊस उत्पादक गट क्र.३ लोणीकाळभोर, मांजरी-फुरसुंगी गट क्र. ४ अशी मतदान प्रक्रियेची व्यवस्था ठेवली आहे. तर केसनंद येथे गट क्र. ५ लोहगाव- केसनंद व गट क्र. ६ वाडेबोल्हाई अशी मतदानाची व्यवस्था केली आहे.

कारखाना कार्यक्षेत्रात हवेली तालुक्यासह पुणे शहर, दौंड तालुक्यातील मतदान असल्याने मतदारांना गटनिहाय मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला लागत होता. त्यामुळे पुणे शहर व पिंपरी- चिंचवड पट्यातील मतदारांनी मतदानास येण्यास फारसा उत्साह न दाखविल्याने मतदानाची संख्या रोडावली आहे. तर ऊस पट्यातील गटातील सभासदांनी मात्र आपला हक्क बजावला आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यापैकी ४१ उमेदवार आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल व आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल मधून रिंगणात आहेत. तब्बल १३ वर्षानंतर ही निवडणूक लागल्याने मतदारराजा नेमका काय निर्णय घेतो कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो याची मोठी उत्सुकता लागली आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!