LPG Cylinder : महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा! गॅस सिलेंडरचा दर केला १०० रुपयांनी कमी, जाणून घ्या…


LPG Cylinder : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरून केली.

पीएम मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुकर होणार नाही तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

त्यामुळे आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी कमी केल्यानंतर तुम्हाला ८०० रुपयांपर्यंत सिलिंडर मिळणार आहे. सरकारच्या घोषणेसह, या नवीन सिलिंडरच्या किमती देखील लागू होतील, याचा अर्थ तुम्ही आता बुक कराल त्या सिलिंडरसाठी तुम्हाला १०० रुपये कमी द्यावे लागतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली. यामुळे महागाईने पिचलेल्या जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळेल. LPG Cylinder

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले की, आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला सलाम करतो. तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण्यासाठी कटिबद्ध आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!