Pandhari Sheth Phadke : राज्याचा गोल्डमॅन हरपला, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे निधन..

Pandhari Sheth Phadke : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. १९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. Pandhari Sheth Phadke
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. आज त्यांचं निधन झालं आहे.

आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.