दारुच्या नशेत फुटपाथवर महिलेचा बलात्कार! जंगली महाराज रस्त्यावर घडला प्रकार..!!

पुणे : दिवसानुदिवस अत्याचार वाढतच चालला आहे. विनयभंग, बलात्कार, खून याचे प्रमाण जास्त वाढतच आहे. अशीच एक घटना पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गोविंद रामा घारोळे (वय-२३ रा. पुलाचीवाडी, डेक्कन) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. बुधवारी रात्री महिला डेक्कन पीएमटी बस स्टॉप मागील फुटपाथवर झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत त्याठिकाणी आला होता. त्याने नशेत असताना महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, याबाबत महिलेने तक्रार देताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.