Fire News : आई-वडील ऊस तोडणीसाठी बारामतीला गेले, अन् घरी घडली चिमुकल्यासोबत भयंकर घटना, घटनेने उडाली खळबळ..


Fire News : धुळ्याच्या लोणखेडी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आई-वडील ऊस तोडणीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात गेले असताना धुळ्यात त्यांच्या दोन चिमुरड्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

संबंधित घटनेनंतर बालकांच्या इतर नातेवाईकांनी घटनास्थळी हंबरला फोडला. मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर आई-वडिलांचा आक्रोश अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा होता. या प्रकरणाची धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सटाण तालुक्यातील वडील दिंगरी येथील रहिवाशी असलेले नाना पवार यांना चार वर्षांची मुलगी रेणू आणि सात वर्ष वयाचा अमोल हा मुलगा आहे. नाना पवार यांची पत्नी लोणखेडी येथील रहिवाशी आहे. पवार दाम्पत्य हे ऊस तोडीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामतीला गेले आहे. Fire News

तर अमोल आणि रेणू ही दोन्ही आजींसोबत होती. गावाबाहेर एका टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही मुले राहत होती. त्यांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजुला गेल्या होत्या. यावेळी झोपडीला आग लागली. वाऱ्यामुळे आगीने जोर धरत झोपडीतील साहित्य आणि पालापाचोळ्याचे छताने पेट घेतला.

या घटनेत रेणू आणि अमोल झोपडीत अडकले. तर बाहेरुन बचावासाठी उशिराने प्रयत्न सुरू झाला. दुदैवाने या घटनेत दोघा मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यानंतर मोठया प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीचे कारण अजून समोर आले नसले तरी चुलीतील विस्तवमूळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!