Pune Accident : रस्ते अपघात सुरुच! पुणे- नाशिक महामार्गावरील भोरवाडी जवळ उभ्या कंटेनरला कार धडकली, कार पेटून ३ जण जागीच ठार..!!


Pune Accident : राज्यात सध्या अपघातांच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. . सध्या असाच एक विचित्र अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मंचर पासून जवळ असलेल्या भोरवाडी परिसरात पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर बंद अवस्थेत उभा होता. त्याच ठिकाणी आज सकाळी एक टेम्पो आणि स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडक झाली.

ही धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकला. काही वेळेतच स्विफ्ट गाडीने पेट घेतला. पाहता पाहता स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून गेली. या भीषण अपघातात स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर, सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक आणि टेम्पो चालक बचावले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अजून प्राप्त झाला नाही. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. Pune Accident

दरम्यान, हल्ली अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक अपघात हे वाहन चालकांच्या चुकांमुळे होत असतात. पण या अपघातात विनाकारण निष्पाप लोकांचा जीव जातो. भीषण अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात. पुन्हा झालेल्या या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!