घोडगंगाचे कामगार थकीत वेतनासाठी चढले चिमनीवर! हतबल कामगारांनी घेतला टोकाचा निर्णय..!!

पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वर्षभरापासून पगार रखडल्याने आंदोलन सुरू आहे. अशातच कारखान्याला सभासद शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ आणि ऊसतोडणी वाहतूकदारांचे पैसे रखडवल्याने साखर आयुक्तालयाने नोटीस बजावून जप्तीचे आदेश दिले आहेत. कामगारांनी थकीत वेतनासाठी चक्क चिमणीवर चढून आंदोलन केले आहे.
कामगारांनी कारखान्याच्या चिमणीवर खाली उतरावे यासाठी घोडगंगा कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बापू काळे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, भाजपचे जिल्हाचे नेते राजेंद्र कोरेकर, भारतीय जनता पार्टी किसन मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष कांडगे, श्रीनिवास घाडगे, शिरूर लोकसभा युवा मोर्च्याचे अध्यक्ष एकनाथ शेलार, युवा नेते महेंद्र बिडगर, दूध संघाचे संचालक निखिल तांबे, शिवसेना संघटक वीरेंद्र शेलार, संचालक आत्माराम बापू फराटे, राजेंद्र गारगोटे, पत्रकार भोईटे, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार प्रमोल कुसेकर, त्याचप्रमाणे शिरूर पोलीस, स्टेशनचे पीआय ज्योतीराम गुंजवटे व त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे जवान व सर्व कारखान्याचे अन्य कामगार विनंती करीत आहेत.
मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. कामगार चिमणीवर चढून आंदोलन करत असल्याने, या आंदोलनाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे. ग्रामस्थांनी कारखाना परिसरात गर्दी केली होती.