Devendra Fadnavis : मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना पटेल असे आरक्षण आम्ही देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य…

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.

मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अशातच आता मराठा आरक्षण बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
ते म्हणाले, ओबीसी आरक्षणला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत. मनोज जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही, पण मराठा समजाला आरक्षण पटेल, मान्य होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व विषयावर आपले मत व्यक्त केले. उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याशिवाय अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरही त्यांनी भाष्य केलेय. तसेच भविष्यात अनेक नेते भाजपमध्ये येतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. Devendra Fadnavis

सध्या मराठा आंदोलन सुरु आहे, त्याला काउंटर ओबीसी आंदोलन सुरु आहे. याला पॉलिटिकल अँगलने मी पाहत नाही. प्रत्येकला जातीतून पाहायचं आहे, हे महाराष्ट्र साठी दुर्दैवी आहे. आम्ही आंदोलनाला सकारात्मक पाहत आहोत. आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही.
आरक्षण देणे हे राज्याच्या हातात आहे, केंद्र सकाराने सुद्धा सांगितले आहे की राज्य आरक्षण देऊ शकतो. मनोज जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समजाला आरक्षण पटेल मान्य होईल. आरक्षण मिळावे यासाठी डेटा आम्ही गोळा करत आहोत, सर्वोच्च न्यायालयने आधी जो निर्णय दिला त्यानंतर आम्ही यावर काम करतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.