व्हॅलेंटाईन डे ठरला शेवटचा! मुलीने घराच्या गच्चीवर तर मुलाने शेतात केली आत्महत्या, नेमकं घडलं काय?


उत्तर प्रदेश : युपीच्या महोबामध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी २० वर्षीय तरुण आणि त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीने विष पिऊन दोघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सुरेंद्र सिंह आणि सीमा मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहे. सीमा आणि सुरेंद्र या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना महोबा जिल्हा रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्तविक, चरखारी येथील कनेरा गावातील रहिवासी असलेल्या सुरेंद्र सिंहचे शेजारी राहणाऱ्या सीमा या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांना त्यांचे अफेअर समजल्यावर त्यांनी त्यांना खडसावले आणि त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. बुधवारी सुरेंद्र ७ वाजता शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला आणि सल्फास घेतले. त्याने सीमाला फोन करून याबाबत माहिती दिली, त्यानंतर मुलीनेही सल्फास प्राशन केले.

गावातील लोकांनी सुरेंद्रला वेदना होत असल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. एका तरुणाने संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघेही चुलत भाऊ बहिण आहेत. सीमा ही इंटरमिजिएटची विद्यार्थिनी होती आणि पाच भावंडांमध्ये ती दुसरी होती. मृत सुरेंद्र हा पदवीचा विद्यार्थी होता. चरखारी शहरातील एका दुकानात तो संगणक ऑपरेटर म्हणून कामाला होता.

मृत सुरेंद्रच्या चुलत भावाने सांगितले की, दररोज सकाळी गावकरी गावात प्रभातफेरी काढतात, यासाठी सकाळी सुरेंद्रला घरी पाहिले असता तो त्याच्या खोलीत नव्हता. त्याचा शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर चंद्रपाल यादव यांच्या शेताजवळ तो गंभीर अवस्थेत पडलेला आढळून आला होता. बेशुद्ध अवस्थेत मृत सुरेंद्र सीमाला वाचवण्याचे वारंवार बोलत होता.

दरम्यान, चरखरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश प्रसाद यांनी सांगितले की, प्रेमी युगुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!