Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा धक्का बसणार, बडा नेता पक्षाला रामराम करणार? चर्चा सुरू…

Sharad Pawar : राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शरद पवार गटातील नेता भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. भाजपच्या प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांचे अनेक निरोप येत आहेत. Sharad Pawar
याबाबत मला काहीच विचारणा झाली नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांची वर काही लाईन असेल तर त्यांनी लावावी. असे मोठे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.

एकनाथ खडसे यांनी दिले स्पष्टीकरण
गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे. असे एकनाथ खडसे यांनी ट्विट केले आहे.

गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2024