Pune Crime News : मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूचे भयंकर कृत्य, पुण्यातील घटना…


Pune Crime News : पुण्यात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने मजनूने स्वत:च्या हातावर ब्लेडने वर करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज रवींद्र बारडे (वय. २४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तनगर परिसरातील एका १६ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी युवराज बारडे याने फिर्यादी यांच्याशी २०२३ पासून मैत्री करुन त्यांच्याशी जवळीक वाढविली. तू आवडतेस तुला मीच शिवणार, तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे, बोलत असे़ जर माझ्याशी नाही बोलली व माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी देत होता. Pune Crime News

फिर्यादी यांच्याशी लैगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने तो बोलू लागल्याने फिर्यादी या घरी निघून आल्या. त्यांचा पाठलाग करुन तो फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादी यांनी त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने तुम्हाला आता दाखवतोच काय असते, असे म्हणून स्वत:ला ब्लेडने मारुन घेऊन जखमी केले आहे. पोलिसांनी या मजनूविरुद्ध पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!