Pune Crime : दागिन्यांची विचारणा केल्याच्या रागातून मुलाने केला थेट आईवरच चाकूने हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना..

Pune Crime : पुण्यातील गुन्हेगारी काही थांबवायचे नाव घेत नाही आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दागिण्यासंदर्भात मुलाला विचारल्यामुळे मुलाने आईवर थेट चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना थेरगाव येथे घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलगा ओंकार ईश्वर बामणे (वय.१९ रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मुलाला आईने दागिन्याबाबत विचारणा केली. दागिने विकले की गहाण ठेवले, असं आईने मुलाला विचारलं त्यानंतर यासंदर्भात माहिती दे नाहीतर पोलिसांना बोलवेल, अशी आईने मुलाला धमकी दिली. Pune Crime


दरम्यान, या धमकीचा मुलाला राग आला आणि रागाचाभारात चाकूने जन्मदात्या आईच्या डोक्यावर आणि हातावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकणी वाकड पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.