Pune News : पुण्यात पुन्हा एकदा ऑनलाइन सेक्स रॅकेट उध्वस्त, बाणेरमध्ये ११ मुलींची सुटका, पाच एजंटवर गुन्हा दाखल..

Pune News : बाणेर भागातील एका उच्चभ्रु परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलवर व्हॉट्सअप तसेच इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी बाणेरमधील लॉज व हॉटेलवर मध्यरात्री छापेमारी करून तब्बल ११ मुलींची सुटका केली.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात रॉकी कदम, राहुल मदन उर्फ मदन सन्यासी, दिनेश उर्फ मामा तसेच नविन व रोशन (नावे पूर्ण माहिती नाहीत) या पाच एजंटवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी तक्रार दिली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, इम्रान नदाफ, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, सागर केकान, राने, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे. Pune News

पुणे शहरातील अवैध प्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. यादरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात एका बड्या हॉटेलमध्ये छापेमारी करत पुणे पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्री आणि दोन रशियन मुलींची सुटका केली होती. याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे एजंट परराज्यात राहून पुण्यात ऑनलाईनच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होते.