Ashok Chavan : मोठी बातमी! अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, फडणवीसांच्या उपस्थितीत अखेर भाजपमध्ये प्रवेश…


Ashok Chavan : गेली तीन दशके काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. Ashok Chavan

आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातलं एक जेष्ठ नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपद भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षसदस्यावर सही घेऊन प्रवेश दिला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल दाखल झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!