शिंदे-उद्धव वादातील एक पैलू 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यास नकार…!
21 फेब्रुवारीपासून 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे मुख्य प्रकरणावर सुनावणी...!

नवी दिल्ली : शिंदे-उद्धव वादातील एक पैलू सध्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. उद्धव गटाने 2016 च्या नबाम रेबिया निकालाचा आढावा घेण्याची मागणी केली होती. स्वतःच्या पदावरून हटवण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना सभापती आमदारांच्या अपात्रतेचा विचार करू शकत नाहीत, असे त्यात म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने सांगितले- 21 फेब्रुवारीपासून 5 न्यायाधीशांचे खंडपीठ मुख्य प्रकरणावर सुनावणी सुरू करेल. त्यादरम्यान नबाम रेबियाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या खटल्यावर परिणाम झाला का, या पैलूवरही चर्चा केली जाईल. सध्या हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले जात नाही. पण प्रश्न अजूनही खुला आहे.
Views:
[jp_post_view]
