Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू, तिघेजण सुदैवाने बचावले…

Accident News : राज्यात अलीकडे अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशातच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने यवत बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलंडत असलेल्या महिलेला उडवले.
या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ज्या महिलेला धडकून ती दुचाकी समोर चाललेल्या कारला जाऊन धडकली आणि कार पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रक जाऊन धडली.या विचित्र अपघाताची घटना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जावजीबुवाचीवाडी जवळ घडली आहे.
भारती पतंगे (वय अंदाजे ५५, रा. वैराग, नाव आणि पत्ता समजू शकला नाही) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी ( ता. १२) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुणे कडून भरधाव वेगाने जाणारी दुचाकीने रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक देऊन अपघात केला. या महिलेला धडक देऊन दुचाकीने समोरुन जात असलेल्या कारला पाठीमागील बाजूस धडक दिली.
त्यामुळे कारने समोर जात असलेल्या कंटेनर ट्रकला जाऊन जोरदार धडक दिली. या अपघातात रस्ता ओलांडत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालकाला गंभीर मार लागल्याने तो गंभीर आहे. कार मधील एअरबॅग मुळे कार मधील एक महिला व दोन पुरुष असे तिघे जण थोडक्यात बचावले. Accident News
दरम्यान, अपघातात कारच्या पुढील आणि मागील बाजूची मोडतोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाताची माहिती मिळता यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दौंडकर घटना स्थळी दाखल झाले. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.