Sharad Mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणी महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती, आता प्रकरणाला वेगळेच वळण….


Sharad Mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गेल्या आठवड्यात पाठलाग करून पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागला आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधारांसह अन्य आरोपींच्या मोबाईच्या विश्लेषणातून पोलिसांच्या हाती सहा ऑडिओ क्लिप लागल्या आहेत. त्यामध्ये या गुन्ह्याच्या कटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. यातून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता असल्याचं तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी म्हटलं आहे. Sharad Mohol murder case

दरम्यान गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या १९ हजार ८२७ ऑडिओ क्लीप आणि कॉल रेकॉर्डिंग मिळाले असून, त्यापैकी १२ हजार ३२० क्लीपचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये सहा महत्त्वाच्या ऑडिओ क्लीप्सचा तपास सुरू आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या सात गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

काय घडले होते?

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची ५ जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पुणे हादरले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!