Vallabh Benke Passes Away : पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन…

Vallabh Benke Passes Away पुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती खालावली होती. ते ७४ वर्षांचे होते. जुन्नर विधानसभेचे त्यांनी अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते.

ते एक पवार कुटुंबियांचं निकटवर्तीय मानले जायचे. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. महिन्यापूर्वीच शरद पवार यांनी जुन्नर दौऱ्यावर असताना वल्लभ बेनकेंची भेट घेतली होती.
त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. वल्लभ बेनके यांच्यानंतर त्यांचे पूत्र अतुल बेनके जुन्नरच्या राजकारणात महत्त्वाचा चेहरा ठरले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नरचे तालुक्यात वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. Vallabh Benke Passes Away

दरम्यान, स्पष्ट वक्तेपणा, धडाकेबाज नेता अशी वल्लभ बेनके यांची ओळख होती. शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणूनही वल्लभ बेनकेंनी काम केले आहे. राष्ट्रवादीशी ते एकनिष्ठ होते. त्यांनी कृष्णा खोरे महामंडळासारख्या विविध पदांवर देखील वल्लभ बेनके यांनी काम केलं आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील घराघरात त्यांनी राष्ट्रवादी पोहचवण्याचे काम केले. वल्लभ बेनके यांचा जन्म २३ जून १९५० रोजी हिवरे बुद्रूक या गावात झाला. वल्लभ बेनके यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. नंतर ते राजकारणात आले.
बेनके यांना विधानसभेची सलग सहा वेळा उमेदवारी मिळाली. त्यापैकी ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यामुळे ते एक मुरब्बी राजकारणी होते. आता त्यांच्या जाण्याने तालुक्यात दुखवटा पसरला आहे.