Pune Crime : बुधवार पेठेत खळबळ! महिलेच्या पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा वस्तऱ्याने गळा चिरून खून…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

महिलेच्या पहिल्या पतीने, तिच्या दुसऱ्या पतीचा वस्तऱ्याने गळा चिरून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बुधवार पेठेतून समोर आली आहे.
नईम शेख असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून कलाम उर्फ रूबेल शेख याला ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.९) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्रांती चौकाच्या बाजूला नवीन सागर इमारतीजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित महिला बुधवार पेठेत वास्तव्यास आहे. कलाम शेख हा तिचा पहिला पती आहे. तर नईम शेख हा तिचा दुसरा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी नईम याने महिलेसोबत लग्न केले आहे. तेव्हापासून ते एकत्र राहात होते. हा प्रकार कलाम याला समजला होता. त्याच्या मनात नईमबाबत राग होता. Pune Crime
त्याच रागातून त्याने शुक्रवारी सायंकाळी वस्तऱ्याने नईमचा गळा चिरून निर्घुण खेन केला. नईम लहान मुलाला घेऊन इमारतीच्या खाली फिरत होता. त्या वेळी कलाम हा तिथे आला. काही वेळातच त्याने खिशातून वस्तरा काढून नईमच्या गळ्यावर फिरवला. जखमी नईमला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर कलाम हा फरार झाला होता. तो रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी कलाम आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.