Theur : चिंतामणी ट्रस्टचा दिलासादायक निर्णय! आता थेऊर येथील चिंतामणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद…


Theur उरुळी कांचन : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (ता. हेवली) येथील चिंतामणी मंदिरातील १०० रुपये भरून व्हीआयपी दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे. नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती.

त्यानंतर ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे. Theur

नाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य व माजी सरपंच कैलास दळवी हे १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिरात शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा फलक त्यांना दिसून आला.

यावेळी दळवी यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत चिंचवड देवस्थानास नोटीस बजावली. पैशाच्या आधारे भेदभाव करणे हे राज्यघटनेशी विसंगत असल्याचे नोटिसीत म्हटले होते.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!