Devendra Fadnavis : पुणे शहराला रिंगरोडमुळे विकासाची नवीन संधी मिळणार! सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोसाठी मुळामुठा नदीच्या भूगर्भात चाचणी घेणार – देवेंद्र फडणवीस


Devendra Fadnavis पुणे : पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाटनुतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार योगेश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी ८० टक्के भूसंपादनापर्यंत पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयटीपार्कच्या भागात आस्थापनांपर्यत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदुषण होणार नाही. Devendra Fadnavis

वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचे काम करण्यात येणार आहे. खोपोली ते खंडाळा दरम्यान ९ किमी मिसिंग लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई-ते पुणे दरम्यान अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे.

पुणे शहरात २४ X ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे.

मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण ५४ कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!