Pune News : आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा पुण्यात भररस्त्यात पिस्तूल काढून राडा, धक्कादायक माहिती आली समोर…

Pune News : आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने किरकोळ कारणावरून पिस्तूल काढून राडा घातल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
सुरक्षारक्षकाकडे शस्त्र परवाना असून, त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत प्रताप धर्मा टक्के याच्याविरुद्ध बुधवारी रात्री उशीरा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांबरोबर त्याचा वाद झाला. प्रतापने त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल तरुणांवर रोखले.
तसेच नंतर शिवीगाळ करून त्याने दहशत माजविली. त्यानंतर सौरभ आणि त्याच्या मित्रांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच शस्त्राचा धाक दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी प्रताप गेल्या वर्षी आमदार रोहित पवार यांच्याकडे खासगी अंगरक्षक म्हणून काम करत होता. सध्या तो त्यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत सौरभ तानाजी काळे याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेनंतर सौरभ घाबरला होता. त्याने याबाबत मित्रांना माहिती दिली होती. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.