Ajit Pawar : प्रसिद्ध अभिनेत्री अजित पवारांवर संतापली, म्हणाली, बेईमानी ओळखते….

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अगोदर शिवसेना पक्ष फुटला. मग खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय यायलाच जवळपास दोन वर्षे लागली. तेच राष्ट्रवादी पक्षही फुटला.

आता निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रावादी ही अजित पवार यांची असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार यांना हा मोठा धक्का बसला आहे. यावर फक्त राजकारणातूनच नाही तर, सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. Ajit Pawar
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. तेजस्विनीने एक्सवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सध्या तेजस्विनीच्या पोस्टची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. “जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे!” अशी पोस्ट तेजस्वीने केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

जनता मूर्ख नाही.
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
दरम्यान, तेजस्विनीने केलेल्या पोस्टमध्ये कुणाचेच नाव घेतले नाही. मात्र, तिने ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितीवरच केल्याचे बोलले जात आहे. तिने अप्रत्यक्षपणे राजकीय स्थितीवर भाष्य केल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे सध्या तिची पोस्ट चर्चेत आहे. तेजस्वीच्या पोस्टवर अनेक वेगेवेगळ्या कमेंट देखील येत आहेत.