Pune Crime : प्रियकर दुसऱ्याच मुलीसोबत फिरायचा, मारहाण करायचा, तरुणीचं टोकाचं पाऊल, घटनेने कुटूंबाला बसला धक्का…

Pune Crime : प्रियकर प्रेयसीला सतत टाळत असल्याने याबाबत विचारणा केली असता प्रियकर तिला सतत तिच्या मित्र-मैत्रिनींसमोरच मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीने हॉस्टेलमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना तीन ऑक्टोबर २०२३ रोजी ‘आयआयएमएस कॉलेज’च्या मुलींच्या डेल्टा होस्टेलमध्ये घडली होती. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात रविवारी (ता.४) फिर्यादी दिली आहे. अश्वनी भारद्वाज (रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी हे ‘एमबीए’चे शिक्षण घेत होते. त्यांचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून आरोपी प्रेयसिला सोडून दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता. Pune Crime

याबाबत प्रेयसीने विचारणा केली असता तिला तिच्या मैत्रिणींसमोर आरोपी मारहाण करीत होता. तिचा अपमान करीत होता. ‘तू मरून जा. मला काही फरक पडत नाही,’ असे म्हणून प्रियकराने प्रेयसीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते.
दरम्यान, या प्रकाराला कंटाळून प्रेयसीने हॉस्टेलमधील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तरुणीच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.
