Politics : लोकसभा निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात, सर्वप्रथम इंदापुरातून प्रचाराचा शुभारंभ…


Politics : लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूरचे ग्रामदैवत श्री इंद्रेश्वराच्या मंदिरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.

त्याचप्रमाणे हजरत चॉंद शहावली बाबा दर्गा येथीही जाऊन कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आज पर्यंत शेतकऱ्यांसाठी व बारामती लोकसभेसाठी केलेल्या कार्याचा आढावा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी या बाजारात आपला भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांशी कार्यकर्त्यांनी संवाद साधला.. देशातील मोदी सरकारच्या धोरणांवर व चाललेल्या अंदाधुंद कारभारावर प्रकाश देखील टाकला. Politics

या भागातील खासदार या संसद महारत्न असून सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा निवडून द्या म्हणत कार्यकर्त्यांनी चंग बांधला. लोकसभा कधीही लागू द्या मात्र बारामती लोकसभेच्या सुप्रिया सुळे यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकांचे रण मैदान तापण्याच्या अगोदरच तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!