Maharashtra Politics : गुंड, दरोडेखोरांनी सरकार ढापलं! ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे, अजित पवारांवर जोरदार निशाणा…


Maharashtra Politics : भाजप आमदारर गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याचं प्रकरण चांगलच पेटलं आहे. या घटनेनंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्ला चढवला जात आहे. अशातच आता ‘सामना’तून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छोटा राजन टोळीतील शार्पशूटर दरोडेखोर दिपक सपकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नाहीतर सामनाच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यासोबत दिपक सपकेंचा फोटो देखील छापण्यात आला आहे. Maharashtra Politics

खासदार श्रीकांत शिंदेच्या वाढदिवासानिमित्त पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर हा वर्षा बंगल्यावर शुभेच्छा देतानाचा फोटो छापला आहे. इतकेच नाही तर मिंद्याचे जंगलराज गुंड, दरोडेखोरांनी ढापलं सरकार या आशेयाची बातमी सामानातून देण्यात आली आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केलेल्या टीकेवर आता राज्य सरकार कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!