Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी आज महत्वाची सुनावणी, अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान..


Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज मोठा दिवस आहे. राज्य सरकारकडून २६ जानेवारी २०२४ रोजी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिसूचना मसुदा जारी करण्यात आला होता. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे आता त्यांना सगे सोयरे प्रमाणपत्र दिले जाईल, असे जाहीर केले होते.

पण आता न्यायालयात ओबीसी वेल्फेअर फाउंडेशन मराठा आरक्षणाला आव्हान दिलं आहे. या प्रकरणावर सुरुवातील तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. पण या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय न्यायाधीश आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडेल. सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर प्रभाव टाकत आहे, असे जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे. Maratha Reservation

अशातच मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि मराठा आरक्षण लागू व्हावं, यासाठी आमरण उपोषण करणार आहे; असे मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहे.

मराठा समाजातील जे लोक विरोधात लिहित आहेत त्यांच्यासाठी मरायला देखील तयार आहे. त्यांनीही १० तारखेनंतर अंतरवाली सराटीमध्ये येवून बसावं, असंही आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!