Chhagan Bhujbal : माझा राजीनामा काय मागता, १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपद सोडलय, छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट…


Chhagan Bhujbal : पक्षातील सहकारी आणि विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत, पण मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि दुसऱया दिवशी अंबडमध्ये ओबीसी रॅली घेतली, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली.

१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.

ते पुढे म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही २७ तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. Chhagan Bhujbal

त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केले. असे ते म्हणाले आहे.

दरम्यान, जिथे ओबीसी लोक राहतात. तिथे दहशत निर्माण केली जात आहे. मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत. न्हावी समाजाच्या दुकानात जायचे नाही असे ठरविले. सर्व नाभिक समाजाने ठरवा एकही मराठा समाजाची कटिंग करायची नाही.

फडणवीस साहेब तुमच्या खात्याचा भेदभाव चांगला नाही. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभा हे काय सुरू आहे. दाव पर सबकुछ लगा है, रुक नाही सकते, तूट सकते है, लेकिन झुक नही सकते, असे छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!