Uruli Kanchan News : कोणाला दोषी धरू नका मला माफ करा! चिठ्ठी लिहून उरुळी कांचन येथील एकाची आत्महत्या…

Uruli Kanchan News : माफ करा, कोणालाही दोशी धरू नका, असे जमिनीवर लिहून ठेवत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुनी तांबे वस्ती परिसरात उघडकीस आली आहे.

याप्रकणी आकाश दिगंबर गोसावी (वय. ३०) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिगंबर गोविंद गोसावी (वय. ५५, रा. जुनी तांबे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दिगंबर गोसावी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच ते सतत आजारी असल्यामुळे त्यांना अशक्तपणा असायचा. तसेच मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आकाश गोसावी यांना खोलीतील फरशीवर खडूने “गौरी मुंगेरीलाल” व “आकाश” मला माफ कर” असे लिहिलेले दिसले.

त्यानंतर तिथेच शेजारी “कोणालाही दोशी धरू नये” असे लिहून त्याखाली सही केलेली चिठ्ठी सापडली. घरातील लोखंडी लोखंडी अँगलला दोरीच्या सहायाने दिगंबर गोसावी यांनी गळफास घेतलेला आढळून आला. Uruli Kanchan News
दरम्यान, यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच गोसावी हे मृत झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.