Supriya Sule : मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका, म्हणाल्या, अध्यादेश सरकारने काढला पण…


Supriya Sule : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्याचा अध्यादेश सरकारने काढला. तो मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांचे आभार देखील मानले आहेत. तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका देखील केली आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा अध्यादेश लवकरही काढू शकले असेत, पण त्यासाठी जरांगेंना मुंबईत यावं लागलं. मग या सरकारने अध्यादेश काढला, त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे दिसून येत असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात अजून धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या देखील आरक्षणाच्या मागण्या आहेत, त्याकडे देखील सरकारने लक्ष द्यावे. मुस्लिम धनगर समजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्या सोबत आम्ही ताकदीने उभे राहू. तसेच त्यांनी नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. Supriya Sule

मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेला मराठा आंदोलनाचा प्रश्न अखेर राज्य सरकारकडून उत्तरी काढण्यात आला. यामुळे मराठा समाजाने एकच जल्लोष केला. आता हे आरक्षण टिकणार का? कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी मराठा समाजाने ही लढाई जिंकली असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!