महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले; नाशकात शुभांगी पाटील तर नागपुरात सुधाकर आडबाले…!


नागपूर : नाशिक पदवीधर व नागपूर शिक्षक मतदारसंघात उमेदवार ठरवण्यावरून महाविकास आघाडीत चांगलाच गोणधलं उडाला होता. अखेर हा तिढा महाविकास आघाडीने चर्चेतून सोडवला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शुभांगी पाटील तर नागपूर येथून काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक संयुक्त पत्रकारपरिषद घेत याबाबतची घोषणा केली.

महाविकास आघाडीच्या घोषणेमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण या तीन शिक्षक मतदारसंघांतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ५ जागांसाठी ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!