पुण्यात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त महसुल कर्मचाऱ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; कर्मचाऱ्यांनी सहारा अनाथालयास १ लाख १७ हजार रुपये देणगी देऊन केलं सेवा कर्तव्य…!


 

पुणे : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटना ,पुणे यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संत गाडगे महाराज धर्मशाळा राजर्षि शाहू गार्डन शेजारी सोमवार पेठ, पुणे येथे शनिवार पार पडला. यावेळी सहारा अनाथालय गेवराई या संस्थेचे प्रमुख संतोष गर्जे यांनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून त्यांचे मनोगत व्यक्त केले.

गर्जे यांच्या मनोगतातून हेलावून जाऊन सेवानिवृत्त महसूल कर्मचारी यांचेमार्फत त्यांच्या सहारा अनाथालय या संस्थेस एक लाख सतरा हजार रुपये रोख देणगी स्वरुपात देण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मीकांत पाचारणे माजी राज्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून महसूल कर्मचारी संघटनेच्या सन २०२३ च्या दिनदर्शिकेचे अनावरण केले.

महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, उपाध्यक्ष- सचिन तारु, सरचिटणीस सचिन तांबोळी, कोषाध्यक्ष मिलींद पोळ, संजय शिंदे, पल्लवी कोकाटे, विनायक राऊत, प्रदिप जावळे, मनिषा पोवार, प्रकाश धानेपकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आपल्या प्रास्ताविकामध्ये दिपक चव्हाण यांनी कोरोना काळामुळे या स्नेहमेळाव्याचे आयोजन करु न शकल्याबाबत दिलगीरी व्यक्त केली. यापुढे नियमितपणे स्नेहमेळावा आयोजित केला जाईल याबाबत उपस्थितांना आश्वासित केले. याप्रसंगी संघटनेचे शशिकांत नेवासकर, किशोर गंभीर, विजय केंगले, कादबाने, बिपिन जाधव, पंढरीनाथ चोंधे-पाटील, पंढरीनाथ पोकळे पाटील, उत्तमराव चोरघे-पाटील, हे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!