Corona Update : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! बड्या खेळाडूला झाली कोरोनाची लागण, टी-20 मालिका अडचणीत?

Corona Update : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंड येथे खेळला जाणार आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंडचा महत्त्वाचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या मैदानावर होणार आहे.
T20 विश्वचषक 2024 ची तयारी लक्षात घेऊन ही मालिका किवी संघासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे, ज्यामध्ये केन विल्यमसनही बऱ्याच काळानंतर खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिचेल सँटनर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर असल्याची माहिती दिली. Corona Update
ज्यामध्ये त्याने लिहिले की, सॅन्टनर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सहभागी होण्यासाठी ईडन पार्कला जाणार नाही. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी काळात वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे.
सॅन्टनर येथून एकटाच त्याच्या हॅमिल्टन येथील घरी जाईल. सँटनर हा किवी संघाच्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा खेळाडू म्हणून खेळतो. ज्यामध्ये त्याने आत्तापर्यंत ९३ सामन्यात १०३ विकेट घेतल्या आहेत आणि बॅटने ६१० धावाही केल्या आहेत.