कोईम्बतूरमधील सिलेंडर स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रनेची राज्यातील 60 ठिकाणी छापा….!


नवी दिल्ली : कोईम्बतूर सिलेंडर स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तीन दक्षिणेकडील राज्यांमध्ये 60 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयितांना अटक करण्याच्या संदर्भात एजन्सीने हा छापा टाकल्याचे सांगण्यात आले.

एनआयएचा तपास चार महिन्यापासून सुरु 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोईम्बतूर येथील मंदिराबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा एनआयए सातत्याने तपास करत आहे. कार बॉम्बस्फोटात कथित ‘मानवी बॉम्ब’ जमीशा मुबीन (29) याचा मृत्यू झाला आहे. कारमधील एलपीजी सिलिंडर फुटला होता. घटनास्थळावरून खिळे, संगमरवरी दगड आणि छर्रे सापडले. सिलिंडरमध्ये ते भरल्यानंतर स्फोटाचा मोठा कट रचण्यात आल्याचा दावा केला जात होता, मात्र तो फसला. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी हा स्फोट झाला.

मारुती 800 कारमध्ये हा स्फोट झाला. मुबीनचा एलपीजी सिलेंडरनंतर संशयास्पद परिस्थितीत जाळून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुबीन हा अभियांत्रिकी पदवीधर होता. 2019 मध्ये एनआयए अधिकार्‍यांनी दहशतवादी संबंधांबाबत त्यांची चौकशी केली होती. बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींमध्ये त्याचे नाव आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!