Pune : मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही, सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती..


Pune पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास स्थगिती आणली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणूक नको, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

यावेळी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी सात आठवड्यांनी घेण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असेही सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. पण सात आठवड्यांनी सुनावणी होईपर्यंत निवडणुका जाहीरही होण्याची शक्यता आहे. Pune

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आवश्यक असतानाही आयोगाने निवडणूक न घेतल्याने पुण्यातील रहिवासी सुघोष जोशी यांनी ॲड. कुशल मोरे, ॲड. श्रद्धा स्वरूप आणि ॲड. दयाल सिंघला यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले होते की, निवडणूक न घेण्याचा आयोगाचा निर्णय विचित्र असून लोकप्रतिनिधींशिवाय ही जागा जास्त काळ रिकामी ठेवणे अयोग्य असल्याचं सांगत मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. इतकेच नव्हे तर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तत्काळ घ्या, असे आदेशही निवडणूक आयोगाला हायकोर्टाने दिले होते

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!