Maratha Reservation : मोठी बातमी! मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, २० जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, मनोज जरांगेंचा मोठा निर्णय…

Maratha Reservation : राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करत आहेत, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचे नाही तर जिंकायचे सुद्धा आहे असे मनोज जरांगे म्हणाले आहे.

त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचे आहे असे म्हणत २० जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनाेज जरांगे-पाटील यांनी आज बीड येथील जाहीर सभेत केली. जो हिंसा करेल तो आपला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणालाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. Maratha Reservation

आतापर्यंत खूप झाले. आता मुंबईत २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचे. मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहे.

सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे.
फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहनही या वेळी मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.