Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षण प्रकरणी हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला…
Maratha Reservation : राज्यात मागच्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला असून, राज्याचे राजकीय वातावरण देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
आज मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर निवेदन मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Maratha Reservation
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री यांच्या रामगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी फक्त अजित पवारच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झाले आहेत.
त्यामुळे या तीन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मराठा आरक्षणावर खरंच तोडगा निघणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.