Parliament Security Breach : ‘आई, मी जे केलं ते….! संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागरचा कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल…

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या लखनौच्या सागर शर्माची सध्या चौकशी सुरू आहे. काल दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागर शर्माला त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलवर बोलायला दिले असे सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागर शर्माची त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवरून चर्चा घडवून आणली. हा संवाद सुमारे ४० मिनिटे चालला. यादरम्यान सागरने कुटुंबीयांना सांगितले की, आपण जे काही केले ते योग्यच आहे. Parliament Security Breach
सागर कॉलवर म्हणाला – आई, घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण आहे का?

त्यावर आई म्हणाली – तू काय केलेस?
सागर – आई, मी जे काही केले आहे ते बरोबर आहे. ते योग्य केले. मी ते कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडण्यात येईल.
मग सागर म्हणाला- आई, तुझी आणि माही(बहीण)ची काळजी घे.
तसेच संवादादरम्यान सागर शर्माने लखनऊ आणि इतर काही ठिकाणच्या त्याच्या घराबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली. ज्यांना पोलिसांनी सोबत नेले आहे. दिल्लीतील स्पेशल सेल टीमला सागरच्या खोलीतून ४ बँक खात्यांची पासबुक सापडली आहेत.
या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. या खात्यांमध्ये कधी, कुठे आणि किती पैशांची देवाणघेवाण झाली, याची माहिती गोळा केली जात आहे. याशिवाय खोलीत पॉकेट डायरी, पुस्तके, फाइल्स, तिकिटे आदी साहित्य सापडले आहे.
दरम्यान सागरच्या वडिलांच्या स्वाक्षरीनंतर ते जप्त करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेने आरोपी सागर शर्माचे आई-वडील आणि बहिणीला एकत्र बसवून चौकशी केली. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.