Pune News : पालकांनो सावधान! नृत्य स्पर्धेसाठी परदेशात घेऊन जातो म्हणून पुण्यात लाखोंची फसवणूक, नांदेड सिटी येथील घटना…


Pune News : पुण्यात फसवणुकीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हंगेरी येथे नृत्य स्पर्धेसाठी क्लासच्या मुलांना घेऊन जातो असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील एका नृत्य प्रशिक्षकाने पालकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

याप्रकरणी नांदेड सिटी येथे राहणाऱ्या सारिका योगेश भोसले यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित नृत्य प्रशिक्षक स्वप्नील मिलिंद लोंढे (वय. ३३ , रा 15/B, शिवशक्ती अपार्टमेंट,किर्तीनगर, वडगाव बुद्रुक,पुणे) याला हवेली पोलिसांनी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी सारिका भोसले यांची मुलगी सुमारे वर्षभरापासून नांदेड सिटी येथील एका नृत्य अकादमीत शिकण्यासाठी जात आहे. काही महिन्यांपूर्वी प्रशिक्षक स्वप्नील लोंढे यांनी पालकांना विश्वासात घेऊन मुलांना हंगेरी येथे होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी घेऊन जायचे असल्याची व त्यासंबंधीच्या खर्चाची माहिती दिली. Pune News

भोसले यांनी विश्वास ठेवून तब्बल तीन लाख साठ हजार रुपये प्रशिक्षक लोंढे याला दिले. मुलांना परदेशात नृत्य सादर करण्याची संधी मिळेल म्हणून भोसले यांच्यासह इतर पालकांनीही लाखो रुपये लोंढे याला दिले. परदेशात जाण्याची तारीख जवळ येऊ लागल्याने पालकांनी त्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली असता स्वप्नील लोंढे याने विमानाची खोटी तिकीटे दाखविली. तसेच स्वप्नील लोंढे हा पालकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करु लागला.

परदेशात जाण्याच्या आनंदाने उत्साहीत झालेली मुले व पालक प्रशिक्षकाच्या या कृत्यामुळे निराश झाली. संतापलेल्या पालकांनी हवेली पोलीस ठाणे गाठले व लोंढे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने स्वप्नील लोंढे याला अटक केली आहे. हवेली पोलिसस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडागळे याबाबत अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!