Accident News : दुर्दैवी! अज्ञात वाहनाच्या धडकेने सख्ख्या भावांचा मृत्यू, केडगावच्या देशमुख मळ्यावर शोककळा..!!


केडगाव/ यवत : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील पत्रा कंपनीजवळ रात्रीच्या वेळी हा अपघात झाला.

कैलास शेळके (वय.५८) आणि पाडुरंग शेळके (वय.५६) (दोघेही रा. देशमुख मळा, केडगाव, ता. दौंड ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल कारण्याचे काम सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Accident News

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव-वाखारी गावच्या हद्दीतील आय.सी. कंपनीसमोर दोन सख्खे भाऊ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. रविवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

तसेच वाहनचालकाने जोरदार अशी धडक दिल्यानंतर त्याच्या मनात भीती निर्माण झाल्याने तो आपले वाहन घेऊन फरार झाला. या जोरदार धडकेत दोघ्या भावाचा मृत्यू झाला. Accident News

याबाबत राजेंद्र जयसिंग शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बावकर हे करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!