Maratha Reservation : राज्यात एकही मराठा उरणार नाही!! मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य, राज्यात खळबळ…


Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. सर्व मराठ्यांना कुणबी जातीअंतर्गत इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र मिळाल्यास राज्यात मराठा समाजाची वेगळी ओळख राहणार नाही, असे मत महाराष्ट्र सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी व्यक्त केले केले आहे. त्यांच्या या विधानाने मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील आरक्षणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात जर सगळे मराठा कुणबी होणार आहेत तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा विधेयक आणा, काय फरक पडतो. पण बाहेर कोण राहणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत. हा ओबीसी यांचा आयोग राहिला नाही. तो मराठय़ांचा आयोग झाला आहे, असा गंभीर आरोपही भुजबळ यांनी केला आहे. Maratha Reservation

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भुजबळ म्हणाले, मी आधीच सांगितले आहे की तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन द्या किंवा इतर कोणतेही विधेयक, लाओ, जेव्हा प्रत्येकजण कुणबी होऊन ओबीसी प्रवर्गात सामील होत आहे, कोण उरणार? अस ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगे-पाटील माझ्याविरोधात बोलतो. कारण, त्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही, असा एकेरी उल्लेख त्यांनी केला. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत, असा आरोपही भुजबळ यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!