शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले यांना ईडीचा दणका ! पुणे व कोल्हापूर येथील २६ कोटी ६० लाखांची मालमत्ता जप्त…! 


पुणे : शिवाजीराव भोसले बँकेच्या ७१ कोटी रुपयांच्या ठेवींत गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्या पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील २६ कोटी ६० लाख रुपयांच्या मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आमदार अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

भोसले यांच्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २६ कोटी ६० लाख रुपयांच्या मालमत्तेबरोबरच १ कोटी ६ लाख रुपयांच्या डिमेट खात्याच्या इक्विटीच्या रकमेचा देखील समावेश आहे. ठेवीदारांची ७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर गदा आणली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!