काँग्रेसमध्ये वाद नाहीत, ही भाजपने उठवलेली वावडी आहे, फेरबदलही होणार- नाना पटोले

no disputes in Congress


मुंबई : सध्या काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहे.

काँग्रेसमध्ये कोणतेच वाद नाहीत. ही भाजपने उठवलेली वावडी आहे, याबाबत नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, पदवीधर निवडणुकीमध्ये विदर्भात झालेला पराभव भाजपला जिव्हारी लागला आहे म्हणून विषय डायव्हर्ट करण्यासाठी अश्या खोट्या बातम्या पेरत आहे.

तसेच ते म्हणाले, भाजपात अंतर्गत खदखद आहे, आमच्यात नाही. दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. यामध्ये काही बदल केले जाणार आहेत.

दरम्यान, माझ्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या संजय राऊत यांना धन्यवाद, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केले ? हे सांगावे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यात त्यांनी लक्ष घालावे ही माझी विनंती आहे, असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!