पाकिस्तानी क्रिकेटमध्ये भूकंप ! विश्वचषकातून बाहेर पडताच कर्णधार बाबर आझमचा राजीनामा


Babar Azam Captaincy Resign । विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर आझमने पन्नास षटक , टी टेव्टी ,कसोटी या तिन्ही फॉरमॅटमधून पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडत आहे.

भारतात सुरू असलेल्या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला
ग्रुप स्टेज मधून बाहेर पडावे लागले आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तान संघाने पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे संघाच्या सुमारे कामगिरीची जबाबदारी स्विकारत बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याचे त्याने सोशल मिडीयावरुन पोस्ट केले आहे.

बाबर आझम याने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे, “गेल्या चार वर्षांत मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे, पण क्रिकेट जगतात पाकिस्तानचा आदर आणि अभिमान कायम ठेवण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आहेत. सर्व व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणे हे खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या मेहनतीचे फळ आहे, पण या प्रवासात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”

 

बाबर आझमने पुढे लिहिले की, ‘आज मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा एक कठीण निर्णय होता पण माझ्या मते योग्य वेळ आली आहे. एक खेळाडू म्हणून मी तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहीन आणि नवीन कर्णधाराला पूर्ण मेहनत आणि समर्पणाने साथ देईन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभारी आहे. पाकिस्तान चिरंजीव. असे ट्विट बाबर अझामी याने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!