Sikandar Shaikh : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “महाराष्ट्र केसरी” सिकंदर शेखचा केला सत्कार..


Sikandar Shaikh : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळचा “महाराष्ट्र केसरी” पैलवान सिकंदर शेख याचा ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. हि माहिती शिवसेना (शिंदे गटा)चे जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात पुण्या जवळील पुलगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत झाली. Sikandar Shaikh

अवघ्या २३ सेकंदात आक्रमक कुस्ती करून पैलवान राक्षे याच्यावर “झोळी” डावाने मात करून पैलवान शेख याने अत्यंत मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकाविला. यामुळे मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचले.

यापूर्वी पैलवान शेख याने प्रयत्न करूनही महाराष्ट्र केसरी पासून त्याला दोन वेळा हुलकावणी बसली होती. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश प्राप्त झाले. यावेळी जिल्हाप्रमुख चवरे यांच्यासह उद्योजक राजू खरे, पेनुर ग्रामपंचायत सदस्य सज्जु शेख, पैलवान बाळासाहेब चवरे, लहू माने, अमोल चवरे, अण्णा माने, रामभाऊ डोके, मुजावर, धनाजी खराटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!