Pune Police MCOCA Action : पुण्यातील सनी जाधव व त्याच्या २ साथीदारांवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ८२ वी संघटीत मोक्का कारवाई..

Pune Police MCOCA Action : पुण्यातील बालाजीनगर परिसरात कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या सनी जाधव व त्याच्या इतर २ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ८२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

सलमान उर्फ सल्या हमीद शेख (वय-२३ रा. बालाजीनगर, पुणे), वैभव उर्फ बबलु उर्फ मनोज विवेक कोठारी (वय. २७ रा. काशीनाथ पाटील नगर, धनकवडी) यांना अटक केली आहे. तर टोळी प्रमुख सनी शंकर जाधव (वय. २१ रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी, पुणे) हा फरार आहे. Pune Police MCOCA Action
भांडण मिटवण्यसााठी बोलावले असता मारहाण करुन एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी बालाजीनगर येथील के.के. मार्केट येथे घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन जणांना अटक केली.

तसेच आरोपी सनी जाधव व इतर साथीदारांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. टोळीचे धनकवडी परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोपींनी सहकारनगर व बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, लोकांमध्ये हल्ले करणे, घातक शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी परिमंडळ- 2 पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.